नितेश राणेंच्या मतदार संघात भाजपा प्रवेशाचा धडाका पुन्हा सुरू

लोरे नं. २, गोरुलेवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपाचा झेंडा

वैभववाडी : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या मतदार संघात भाजपा प्रवेशाचा धडाका पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आज लोरे नं. 2, गोरुलेवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी आ. राणेंच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. लोरे येथे हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, आचिर्णे सरपंच रुपेश रावराणे, आदेश रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, बुथ अध्यक्ष भरत मांजलकर व पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश गवाणकर, सखाराम मांजलकर, प्रकाश मांजलकर, राजेंद्र कदम, रवींद्र धावडे, सागर कदम, सोमा मांजलकर, योगेश मांजलकर, संकेत कदम, मनोहर मांजलकर, राजेंद्र मांजलकर, रमेश मांजलकर, अनिल मांजलकर, श्रेयस मांजलकर, सुरेश मांजलकर, मारुती मांजलकर, गणपत मांजलकर, संभाजी गवाणकर, सचिन मांडवकर, सचिन गवाणकर, सुभाष गवाणकर, रामचंद्र गवाणकर, सुभाष गोरुले, भिकाजी गोरुले, शांताराम मांजलकर, बाळकृष्ण मांजलकर, विशाल धावडे, तुषार मांजलकर, प्राची मांजलकर, संगीता कदम, रिया कदम, साक्षी मांजलकर, मनीषा मांजलकर, विजया मांजलकर, शुभांगी गवाणकर, विजया मांजलकर, प्रियांका मांजलकर व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, प्रवाहाबरोबर येण्याचा गोरुलेवाडीवासियांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. लोरे गावच्या विकासाची जबाबदारी ही आता आमची वाढली आहे. विकासाची चिंता करू नका. यापुढे आपल्यातील संवाद महत्त्वाचा आहे. संवादातूनच जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लागतात. नासीर काझी म्हणाले, आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून गावात यावर्षी चार विकासकामे मंजूर आहेत. रितेश सुतार यांच्या विकासाबाबतच्या चळवळीला दाद द्यावी लागेल. सर्वांनी एकजुटीने पक्षाचे काम करा. निधी कमी पडणार नाही. यावेळी आमदार नितेश राणे यांचा ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश सुतार यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!