कणकवलीत स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांचा निर्धार; १५ दिवसांत भगवा सप्ताह, ६३ गावांत गावभेट दौरे!
वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षाचे आवाहन; सुशांत नाईक यांच्याकडून संघटनात्मक बांधणीचा कृती आराखडा जाहीर!
कणकवली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत जनतेच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आक्रमकपणे संघर्ष करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
यावेळी विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, राजू राठोड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, मराठी माणसाला महाराष्ट्रात न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. सत्ता असो अथवा नसो, कार्यकर्त्यांनी जनतेसाठी काम करत राहिले पाहिजे, ही शिकवण त्यांनी शिवसैनिकांना दिली. केवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांचे विचार जपले जात नाहीत, तर ते विचार आत्मसात करून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आवश्यक आहे. राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेला काही काळ अडचणींचा सामना करावा लागला असला, तरी आजच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली निष्ठा दाखवून दिली आहे.
जिल्ह्यात रोजगार, विकास आणि सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्याच त्याच कामांची पुनरावृत्ती करण्यापेक्षा मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी पुन्हा एकदा संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांसाठी ताकदीने लढावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
दरम्यान, कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची घोषणा केली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून तालुक्यात संघटनात्मक बांधणीला नव्या जोमाने सुरुवात करण्यात येणार आहे. पुढील पंधरवड्यात ‘भगवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून, तालुक्यातील ६३ गावांमध्ये गावभेट दौरे आयोजित केले जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये जुन्या शिवसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.
संघटनेपासून काही काळ दूर असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत बैठका घेऊन तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क वाढविण्यात येणार आहे. याशिवाय कणकवली तालुक्यात लवकरच भव्य शिवसैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही सुशांत नाईक यांनी केली. ‘गाव तिथे शिवसेना, शिवसेना तिथे गाव’ या संकल्पनेतून प्रत्येक गावात संघटना सक्रिय करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, राजू राठोड, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, विभागप्रमुख विलास गुडेकर, बबली राणे, गुरु पेडणेकर, ओमप्रकाश ताम्हाणेकर, रवींद्र खंदारे, तात्या निकम, सिद्धेश राणे, राजू राणे, रुपेश आमडोसकर, ॲड. हर्षद गावडे, रोहित राणे, तेजस राणे, संतोष परब, अनंत राणे, महादेव राठवड, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, शोभा बागवे, ललित घाडीगावकर, लवू पवार, विठोबा मर्ये, दया मेस्त्री, सुरेंद्र पाटकर, दिवाकर पारकर, प्रमोद सावंत, आनंद महाडेश्वर, महेश मोर, उमेश मोर, आसिफ मुजावर, फय्याज खान, संतोष राणे, दिवाकर परब, सुरेश रासम, प्रकाश शिंदे, आप्पा तावडे, अनिल नरे, आत्माराम घाडी, गोपाळ लोके, नरेश दळवी, संतोष तेली, चंदू परब, मोहन तांबे, नितेश राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.





Subscribe to my channel




