वचनपूर्ती : आ. नितेश राणेनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका

“त्या” युवकांना दिला होता “शब्द” ; पंचक्रोशीतील रुग्णांची गैरसोय टळणार

वैभववाडी ‌‌: आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द पाळत उंबर्डे मेहबूब नगर व दशक्रोशीतील ग्रामस्थांची रुग्णवाहिकेची मागणी पूर्ण केली आहे. स्वखर्चातून आ. नितेश राणे यांनी रुग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी व जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

उंबर्डे मेहबूबनगर मधील युवकांची आ. नितेश राणे यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी होती. उंबर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास १८ गावातील रुग्ण या केंद्रात उपचार घेतात. परंतु या केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने याचा फटका रुग्णांना बसतो. मेहबूबनगर वासियांकडे सुपूर्द केलेल्या रुग्णवाहिकेचा चांगला फायदा हा रुग्णांना होणार आहे. यापूर्वी मतदारसंघातील जवळपास १५० शाळा आ. नितेश राणे यांनी डिजिटल केल्या आहेत. तसेच वैभववाडी शहरातील सुलभ शौचालय, कचराकुंडी व इतर सुविधा आ. नितेश राणे यांनी स्वखर्चातून पुरविल्या आहेत.

मेहबूबनगर व उंबर्डे दशक्रोशीतील ग्रामस्थांची रुग्णवाहिकेची मागणी आ. राणे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रजा स्पोर्ट्स आयोजित बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी पार पडला. यावेळी नासिर काझी म्हणाले, मेहबूबनगरच्या युवा पिढीच्या मागणी नुसार आमदार साहेबांनी ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करुन दिली. तसेच ही सेवा संपूर्ण उंबर्डे दशक्रोशीतील लोकांना मिळावी हाच याचा उदात्त हेतू आहे. भालचंद्र साठे म्हणाले, ही सेवा अविरत चालू राहील. जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचा चांगला फायदा होईल. लोकार्पण प्रसंगी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, युवा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, ग्रामपंचायत सदस्य रज्जब रमदूल, चेअरमन उमर रमदूल, हाजी अब्दुल नाचरे, दस्तगीर रमदुल, अस्लम बोबडे, करीम पाटणकर, नासिर सारंग, रमजान रमदुल, महमद रमदूल, हाजी सय्यद नाचरे, हसन रमदूल, हसन नाचरे, अ. रहीमान पाटणकर, आदम बोबडे, अब्दुल बोबडे, शिराज रमदूल,सय्यद थोडगे, शाबान राऊत, प्रसाद पांचाळ, समीर लांजेकर, रेहान स्पोर्ट्स, पाकीजा स्पोर्ट्स, रझा स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू, जिल्ह्यातील नामवंत खेळाडू व तमाम ग्रामस्थ उपस्थित होते. आभार रज्जब रमदूल यांनी तर सूत्र संचालन कादिर फरास यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!