YBIT मध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शारीरिक वाढ सुधारण्यावर भर

सावंतवाडी : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण व शारीरिक वाढ सुधारण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (YBIT) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत २७ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जंतसंसर्गाचे दुष्परिणाम, त्यापासून बचाव आणि आरोग्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.जंतसंसर्गाचे प्रमाण कमी करणे, रक्तक्षयाचा धोका घटविणे तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य व पोषणस्थिती सुधारणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

२७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळ्या घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ३ नोव्हेंबर रोजी आयोजित मॉप-अप दिनी गोळ्या देण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी या मोहिमेचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

error: Content is protected !!