प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवशी विशाल परबांचा ‘मदतीचा हात’; किडनीग्रस्त रुग्णाला आर्थिक आधार

तळवडेतील शामसुंदर मालवणकर यांच्या उपचारासाठी विशाल परब यांचा पुढाकार; वाढदिवसाचा उत्सव सेवाभावातून साजरा

सावंतवाडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून ‘एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला. तळवडे येथील रहिवासी शामसुंदर मालवणकर हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून, सध्या मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन विशाल परब यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली.

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि उत्सवापुरते मर्यादित न राहता गरजूंच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा आगरवाडेकर, सुभाष कुंभार, तळवडे गावचे उपसरपंच गौरव मेस्त्री तसेच बाळा जाधव उपस्थित होते.

गरजू रुग्णाच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा, संवेदना आणि सामाजिक दायित्वाची सांगड घालणारा हा उपक्रम ठरला.

error: Content is protected !!