मनसेच्या मालवणातील बैठकीत निर्णय ; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याची बैठक रविवारी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत मालवणात घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात मालवण तालुक्यातील पक्ष वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच रिक्त पदावर लवकर नव नियुक्त्या जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या गणपती उत्सवात भक्ताची गैरसोय होऊ नये यासाठी पक्षाकडून उपाय योजना करणे व १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शाखेच्या उदघाटन संदर्भात चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालूकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, मालवण शहरध्यक्ष सागर जाधव, उप विभाग अध्यक्ष संतोष सावंत, सुकळवाड शाखाध्यक्ष अर्जुन अटक, हेदूळ शाखाध्यक्ष सुरज पुजारे, महाराष्ट्र सैनिक हरि खवणेकर, नारायण शिरोडकर, प्रसाद मेस्त्री, सचिन परब, प्रितेश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर तसेच तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांनी मार्गदर्शन केले.