घरात आई-मुलगा असताना घडली घटना; तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द
मालवण : वायरी येथील श्रीमती अनिता आनंद राऊत यांच्या राहत्या घरावर माडाचे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेच्या वेळी घरात अनिता राऊत आणि त्यांचा मुलगा अक्षय राऊत हे दोघेही उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात राऊत कुटुंबीयांना आधार देत शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख गणेश (पप्पू) लुडबे, ओंकार तळगावकर, राहुल नरे, ऋषिकेश लुडबे, किरण तळगावकर, अरुण धामापूरकर, बाबू राऊत आणि सौ. वराडकर उपस्थित होते. संकटाच्या प्रसंगी बाधित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत त्यांना मदतीचा हात देण्यात आल्याने राऊत कुटुंबीयांना दिलासा मिळाला.