मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात महाविकास आघाडीत थेट लढत
२५ जणांची माघार ; १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात
मालवण : येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास आघाडी पुरस्कृत श्रीदेव रामेश्वर नारायण सहकार पॅनेल व भाजप पुरस्कृत श्रीदेव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेल यांच्यात आता ही निवडणूक होणार आहे.
तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात भाजप पुरस्कृत, महाविकास आघाडी पुरस्कृत, कै. सुनील मलये पुरस्कृत तर अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संस्था मतदारसंघातून चेतन मुसळे, सतीश परुळेकर, अशोक नांदोसकर, विनायक बाईत, व्हिक्टर डांटस, संतोष गावकर, व्यक्तिगत मतदारसंघातून सुभाष तळवडेकर, राजन वराडकर, अरुण तळगावकर, सौगंधराज बादेकर, अशोक सावंत, कृष्णा ढोलम, संतोष चव्हाण, राजन भोजने, ज्ञानदेव ढोलम, कृष्णा चव्हाण, संतोष गावकर, महिला मतदारसंघातून सीमा कवठकर, पूजा करलकर, मनाली चव्हाण, मनवा गावकर, अनुसूचित जाती जमातीतून राजेश तांबे, सदाशिव महाभोज, इतर मागास वर्गातून श्रीकृष्ण तळवडेकर, विजय ढोलम, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातून यशवंत पराडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
संस्था मतदार संघातून श्रीकांत बागवे, अरुण भोगले, कृष्णा चव्हाण, उदय दुखंडे, राजन गावकर, सदाशिव महाभोज, महेश मांजरेकर, विठ्ठल नाईक, प्रफुल्ल प्रभू, अभय प्रभूदेसाई, राजेंद्र प्रभूदेसाई, व्यक्तिगत गटातून महेश अंधारी, विनय ढोलम, महेश गावकर, गोविंद गावडे, रमेश हडकर, देवानंद लुडबे, मनोज लुडबे, संतोष पांगे, मनोज राऊत, अनुसूचित जाती जमातीतून नागेश अटक, सुरेश चौकेकर, इतर मागास वर्गातून कृष्णा ढोलम, सुभाष तळवडेकर, भटक्या विमुक्त जाती जमातीतून मेघनाद धुरी, अशोक तोडणकर, महिला गटातून साक्षी लुडबे, नीना मुंबरकर, सरोज परब, अमृता सावंत या निवडणूक रिंगणात आहेत.
महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या उमेदवारांना आंबा हे चिन्ह मिळाले आहे. भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेलच्या उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. देवानंद लुडबे यांना चाक तर संतोष लुडबे या अपक्ष उमेदवारांना आकाश कंदील हे चिन्ह मिळाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी दिली.