शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही ; श्री देव भूतनाथ मंदिरात गोपाळकाल्यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न


मालवण | कुणाल मांजरेकर
जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वायरी भूतनाथ गावातील श्री देव भूतनाथ मंदिरात प्रतिवर्षी गोपाळकाल्याच्या निमित्ताने सत्यनारायणाच्या सार्वजनिक महापूजा व सास्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपस्थित होते. गावातील विधायक कार्य असो किंवा सांस्कृतिक, आपण सदैव आपल्या सोबत असल्याचा विश्वास दत्ता सामंत यांनी देत यापुढे मंडळ आणि मंदिराला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मंडळाच्या वतीने दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. तर दत्ता सामंत यांच्याहस्ते

उपस्थित दशावतार कलाकारांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, शिवसेना विभाग प्रमुख मंदार लुडबे, देवली सरपंच शाम वाक्कर, शहर संघटक राजू बिडये, देवानंद लोकेगावकर, वायरी माजी उपसरपंच संदेश तळगावकर, मंडळाचे सहकारी प्रकाश पेंडुरकर, काशिनाथ मांजरेकर, बाबल पेडणेकर, शंकर मसुरकर, आनंद हडकर, दीपक देऊलकर, कृष्णा मांजरेकर, मंगेश झाड, संकेत वस्त, विकी लोकेगावकर, विजय मालवणकर, मुन्ना झाड, जीवन मसुरकर, संदेश झाड, प्रशांत नांदोसकर, हिरो तळवडेकर, हर्षद हळदणकर, नंदू झाड, दीपक ढोलम, बबन आडयेकर, तेजस देऊलकर, अक्षय देऊलकर, चैतन्य बोडवे, साहिल बोडवे, वैभव मसुरकर, मंदार बोडवे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.


















Subscribe to my channel




