पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील आरोग्याचा मेगा कॅम्प ठरला ‘वरदान’

देवबाग मधील ९ वर्षीय मुलावर शासकीय योजनेतून मुंबईतील नामांकित रुग्णालयात मोफत हृदयाची शस्त्रक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरे (मेगा कॅम्प) घेण्यात येत आहेत. कणकवली येथे २७ फेब्रुवारीला पार पडलेल्या मेगा कॅम्प मध्ये करण्यात आलेली आरोग्य तपासणी एका बालकासाठी जीवनदान देणारी ठरली आहे. या शिबिरात मालवण तालुक्यातील देवबाग येथील कु. झेविअर फर्नांडिस या ९ वर्षीय मुलाच्या हृदयात दोष असल्याचे निदान झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, या मुलाला पुढील उपचार व शस्त्रक्रिया करणेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयात मुंबई येथे संदर्भित करणेत आले. सदर बालकावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली आहे.

कणकवली येथे आयोजित या मेगा कँपमध्ये ६६ बालकांची तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये करण्यात आलेल्या ‘२डी इको’ चाचणी दरम्यान कु झेवियर फर्नांडिस या 9 वर्षीय मुलाच्या हृदयात दोष असल्याचे निदान झाले होते. या बालकावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. या मुलाच्या तपासणी साठी जिल्हा परिषद सदस्या सौ. गावडे यांनी प्रयत्न केले. तर डॉ. जागृती ढोके यांनी प्राथमिक तपासणीत या मुलावर उपचार केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेगा कॅम्प च्या नियोजनाचे कौतुक होत आहे.

दरम्यान, येत्या २४ मार्च रोजी उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मेगा कँप आयोजित करणेत आला असून सदर मेगा कँप मध्ये किम्स हॉस्पिटल ठाणे येथून तज्ज्ञ डॉक्टर यांची टीम उपस्थित राहणार आहे. यावेळी 0 ते 18 वर्षे वयोगटात बालकांची 2D इको तपासणी करण्यात येणार आहे. तरी शिबिराचा जास्तीत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग आरोग्य विभागामार्फत केले आहे.

error: Content is protected !!