खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस गावातील दोन प्रशालाना संगणक भेट

आ निरंजन डावखरे यांच्या निधीतून उपलब्ध ; माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती

विद्यार्थ्यांसमवेत केक कापून खा. राणेसाहेबांचा वाढदिवस साजरा

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील किर्लोस आंबवणे व किर्लोस गावठणवाडी या दोन जि. प. शाळांसाठी आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून संगणक भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी लहान मुलांच्या उपस्थितीत केक कापून राणे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर, पंचायत समिती सदस्या सौ. सीमा परुळेकर, माजी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, उप सरपंच अजित लाड, रामगड सरपंच शुभम मठकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, गोपी लाड, प्रवीण घाडीगावकर, संजना लाड, सुनील घाडीगावकर, शुभम बाक्रे, नंदन परुळेकर, कृष्णा घाडीगावकर, समीक्षा लाड, भास्कर लाड, राजू घाडीगावकर, श्री. मालंडकर, सौ. भावे यांच्यासह प्रशालेतील, ग्रामस्थ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक राणे मॅडम यांनी केले.

यावेळी बोलताना अशोक सावंत म्हणाले, दादांनी आमदार म्हणून जिल्ह्यात आल्यापासून येथील जनतेचे प्रेम मिळवले. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंदर नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या मतदार संघातील कार्यकर्ते १९९० पासून राणेसाहेबांच्या पाठीशी असून राणेसाहेबांची शंभरी याच गावात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांच्या वतीने अशोक सावंत यांनी केला.

यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर म्हणाले, संगणक ही काळाची गरज आहे. आपली मुले भविष्यात पुढे जाण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. हे ओळखून गावातील भाजप पदाधिकारी प्रवीण घाडीगावकर व युवासेना तालुकाप्रमुख अभिमन्यू लाड या दोघांनी विशेष प्रयत्न करून गावातील दोन शाळांना हे संगणक मिळवून दिले आहेत. विकासात्मक कामासाठी अशी स्पर्धा असली पाहिजे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करूया, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महेंद्र चव्हाण, सौ. सीमा परुळेकर, गोपी लाड, अभि लाड यांनीही विचार मांडले.

error: Content is protected !!