मालवण : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत ५५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वाईरकर, मनसे तालुकाप्रमुख गॅरी अननसिएशन, श्री. मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना गणेश वाईरकर म्हणाले, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असून समाजातील गरजवंत विद्यार्थी शिक्षणापासून किंवा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहता कामा नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. तर भविष्यात मसुरे गावातील गरजवंत विद्यार्थ्यांच्या मागे मनसे खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही तालुकाप्रमुख गॅरी अननसिएशन यांनी दिली.
यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर, लोकल कमिटी सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर, समीर नाईक, रमेश पाताडे, डी पी पेडणेकर, अनिल मेस्त्री, विशाखा जाधव, आर्या भोगले, प्रगती मोरे, भानुदास परब, शशांक पिंगुळकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेच्या वतीने लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब यांनी मनसे पदाधिकारी आणि मनसे पक्षाचे आभार व्यक्त करून संस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करून आभार पत्र दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना मसुरेकर आणि आभार दयानंद पेडणेकर यांनी मानले.