लाडक्या बहिणींकडून कुडाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभारपत्र व राख्यांची भेट

आमदार निलेश राणे यांच्याकडे भेट केली सुपूर्द ; आ. निलेश राणे यांना महिला शिवसेनेकडून रक्षाबधन

कुडाळ : लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट म्हणून आमदार निलेश राणे यांच्याकडे कुडाळ येथे सुपूर्द करण्यात आली. तसेच आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले.

कुडाळ येथील महायुतीच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा महिला सचिव आशा ओळप्पी, नूतन आईर, रेवती राणे, श्रुती वर्दम, दीक्षा सावंत, रचना नेरुरकर, नगरसेविका चांदणी कांबळी, अनुप्रिती खोचरे, वैशाली पावसकर आदी महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!