युवक काँग्रेसच्या वतीने मालवणात शिक्षक दिन साजरा…

कुणाल मांजरेकर

मालवण : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी मालवण मध्ये युवक काँग्रेसने जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार केला. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे महत्त्व असते. त्याच प्रमाणे समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते, अशा भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हा युवकचे देवानंद लुडबे, युवक प्रवक्ते अरविंद मोंडकर, माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, हर्षदा पाटील, पल्लवी तारी, माजी शिक्षक विनायक कोळंबकर, रमेश आचरेकर, श्रीकृष्ण नातू, दिलीप नार्वेकर, रंजन तांबे, अभय शेर्लेकर, दीपक जाधव, शिक्षिका प्रभावती वाडकर, जयश्री हडकर, मिनल सारंग, मिनल वस्त, रश्मी आचरेकर, शोभा माडये, सुप्रिया बांदेकर, हेमा परुळेकर, शोभना नातू, फिलोमीना पंडित, अदिती शेर्लेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण भारत देशात सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. म्हणूनच आम्ही देखील आपला गुरुजनांचा सत्कार करणं आपलं भाग्य समजतो, अशा भावना यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी व्यक्त केल्या.
तर शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होत असते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते, असे देवानंद लुडबे म्हणाले. आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी व शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो त्यामुळे आम्ही देखील आज आपल्या शिक्षकांच्या प्रति त्यांचे ऋण व्यक्त करतो, असे पल्लवी तारी म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद मोंडकर यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. नीलम करंगुटकर यांनी केले.

सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हालाही सामाजिक कार्यात यायचं असतं. परंतु या उतारवयात जास्त धावपळ जमत नसते. तरी ही युवक काँग्रेसच्या वतीने आम्हा शिक्षकांना एकत्रित करून आमचा सत्कार करण्यात येतोय, ही आम्हाला गुरू दक्षिणा देत आहात. या निमित्ताने सर्वजण एकत्रित आल्याने पुन्हा वर्ग भरल्याचा आनंद आम्हांस झाला आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांच्या वतीने युवक पदाधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो.
विनायक कोळंबकर
सेवानिवृत्त शिक्षक

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!