किर्लोस गाव ‘शिवसेनामय’ ; महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांचा प्रचाराचा झंझावात

केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ‘विश्वाची सफर’ करण्याची स्वप्ने धुळीला मिळणार : विजयाचा गुलाल शिवसेना महायुतीच उधळणार

शिवसेना जिल्हा सचिव गणेश बाक्रे यांसह महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ; किर्लोस गावात भव्य प्रचार रॅली

मालवण : आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त किर्लोस येथील ग्रामदैवत श्री देवी पावणाई-रामेश्वर मंदिरात देवतांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली. यावेळी सौ. घाडीगांवकर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

शिवसेना, भाजप महायुतीच्या माध्यमातून गावागावात उत्स्फूर्तपणे प्रचार यंत्रणा राबविली जात असून किर्लोस गावातून बहुमताचे मतदान महायुतीच्या पारड्यात पडेल, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हा सचिव गणेश बाक्रे यांनी व्यक्त करत सौ. सोनाली घाडीगावकर यांचे जिल्हापरिषद सदस्य म्हणून श्री देव रामेश्वराने सिलेक्शन केले आहे. या निवडणुकीत मतदारसंघात जेष्ठ तसेच तरुण पिढी ज्या तन्मयतेने प्रचारात झोकून देऊन काम करत आहे, शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी आणि विकासाचे विचार घराघरांत पोहोचले आहेत. विरोधी पक्ष केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ‘विश्वाची सफर’ करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र त्यांचे स्वप्न मतदार धुळीला मिळवतील. ९ तारखेला विजयाचा गुलाल आम्हीच अर्थात शिवसेना महायुती उधळणार, हे आता निश्चित झाले आहे असे बाक्रे म्हणाले.

यावेळी मोठया संख्येने शक्तीप्रदर्शन करत डोअर-टू-डोअर’ प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सोनाली घाडीगावकर या ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी उमेदवार सोनाली घाडीगावकर, सुनील घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, सुशांत घाडीगावकर, बाळा लाड, अभिमन्यू लाड, सुनील सदाशिव घाडीगावकर, विनोद भावे, विलास भावे, माजी पोलीस पाटील प्रकाश भावे, गुरुनाथ चव्हाण, प्रकाश किर्लोसकर, सागर घाडीगावकर, कमलेश घाडीगावकर, संतोष भावे, हर्षद घाडीगावकर, प्रशांत परब यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!