मालवणात आज नरकासूरांचा थरार ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची नरकासूर स्पर्धा

आकर्षक बक्षिसे ; बच्चेकंपनीने बनवलेल्या नरकासूरांसाठीही विशेष स्पर्धा

मालवण : भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भरड तारकर्ली रोड येथे ही स्पर्धा होणार आहे. यावर्षीच्या दिवाळीत शहरातील लहान मुलांचा उत्साह लक्षात घेऊन बच्चे कंपनीसाठी लहान नरकासुर स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या दोन विजेत्यांना रोख रकमेची आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

मालवण भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर आणि मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी प्रथमच तरुणाई बरोबरच बच्चे कंपनीसाठी नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इकोफ्रेंडली धर्तीवर होणार असून यामध्ये नरकासुर बनवताना प्लास्टिक थर्माकोल आणि फोमचा वापर करू नये. या स्पर्धेतील मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ८,८८८ रु., द्वितीय क्रमांक – ४४४४ रु. तृतीय क्रमांक २२२२ रु. अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. कोरोना नंतर मोठया उत्साहात साजरा होणारा दिवाळीचा आनंद मनमुराद लुटू पाहणाऱ्या बच्चे कंपनीने लहान नरकासुर बनविले असून या मुलांचा उत्साह लक्षात घेऊन सौरभ ताम्हणकर यांनी लहान गटासाठीही नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. यातील पहिल्या दोन क्रमांकाना रोख रकमेची पारितोषिक जाहीर करण्यात आली असून लहान गटातील प्रथम विजेत्या स्पर्धकाला २,२२२ रुपये व द्वितीय क्रमांकाला १,१११ रुपये बक्षिस दिले जाणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी निषय पालेकर मोबा ९९७५५५७१२३ व तुषार वाघ मोबा क्रमांक ७२०८४३००७६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!