मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मराठवाडा दौऱ्यावर ; फुलंब्री धरण परिसराची पाहणी

अतिवृष्टीत धरण परिसरातील मच्छीमारी व्यवसायाचे नुकसान ; पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याचे निर्देश

मच्छीमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी साधला प्रत्यक्ष संवाद

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी मच्छीमार व्यवसायातील अडचणी, नुकसानीचे स्वरूप व तातडीने आवश्यक उपाय समजून घेतले.

मंत्री नितेश राणे यांनी पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याचे ठोस निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. फुलंब्री धरण परिसरातील व्यवसायासाठी मच्छीमारांना त्वरित मदत पोहोचवणे आणि नुकसानाची पहाणी हा या दौऱ्याचा उद्देश होता.

error: Content is protected !!