श्रावण आणि त्रिंबक सोसायटी चेअरमनांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार
दोन्ही सोसायटींच्या सभासदांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही
मालवण : श्रावण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दुलाजी परब आणि त्रिंबक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीकांत बागवे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. येत्या काळात सोसायटीसाठी जे काही सहकार्य लागेल, ते देण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले. सोसायटीच्या वतीने देखील आ. वैभव नाईक यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, सुभाष धुरी, श्रावण सोसायटी संचालक वैशाली परब, रसिका मालप, गणेश चव्हाण, विजय गवळी तर पळसंब येथे त्रिंबक सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमेश परब, गणेश तोंडवळकर, मंगेश गावकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, दादा गावकर, अनिल पुजारे, मधुकर कदम, पिंट्या सावंत, अविनाश परब आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.