कुंभारमाठ येथे युवतीचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी नजिक नाजिया सनाऊला खान या २० वर्षीय युवतीचा घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. तीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तिच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.

नाजिया ही दोन महिन्यापासून आपल्या वडिलांना मी कुठेतरी कामाला जाते असे सांगायची. मात्र तिच्या वडिलांनी तिला कामाला जाण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ती घरात गप्प असायची. शनिवारी रात्री नाजियाची आई घरात नमाज पठण करत होती. तर ती बाहेरच्या खुर्चीवर बसली होती. वडील आणि भाऊ वायरी येथे नमाज पठण करण्यास गेले होते. आईने नमाज पठण करून झाल्यावर नाजिया हिला शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा ती घरानजीकच्या आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकताना आढळून आली. घरी तिचे वडील आल्यावर त्यांनी तात्काळ मालवण पोलिसांना याची माहिती दिली असता महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, सुशांत पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती बहीण आफ्रिन सनाऊला चौधरी यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

error: Content is protected !!