शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी प्रशासनाचे मानले आभार : हरी खोबरेकर मित्रमंडळाचेही कौतुक
मालवण : मालवण शहरात अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात निर्विघ्नपणे पार पडला. शहरात नगरपालिका, पोलीस, महावितरण कंपनीसह प्रशासनाने अथक प्रयत्न करून गणेश विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्य केले. याबद्दल शिवसेना शहरप्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी प्रशासनाचार आभार मानले आहेत. गणेश विसर्जन करण्यासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळाने निःस्वार्थ भावनेने केलेल्या सहकार्याबद्दल श्री. पाटकर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
मालवण शहरात अनंत चतुर्दशी पर्यंतच्या गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा शुक्रवारी पार पडला. या कालावधीत महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य केले. नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील या कालावधीत शहर स्वच्छतेसाठी नियोजन करून शहरातील व्यापारी व नागरिकांच्या मदतीने त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. या सर्व यंत्रणांच्या मदतीने मालवणचा गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा झाला. तर विसर्जनासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळाने निःस्वार्थ भावनेने काम करून भाविकांचा फार मोठा भार हलका केला, या बद्दल या सर्वांचे दीपक पाटकर यांनी आभार मानले आहेत.