कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : विधानपरिषद निवडणुकीसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोकण विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे हे अत्यंत योग्य उमेदवार असून त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून केलेले काम उल्लेखनीय राहिले आहे. भविष्यातही ते अधिक प्रभावीपणे काम करतील. ही निवडणूक महायुती म्हणून एकदिलाने लढवणार आहे. आजचे महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता भासू नये, अशी परिस्थिती आहे. २२ जून रोजी होणाऱ्या निकालात भाजपचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास यावेळी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!