आपण केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे ठाकरे शिवसेनेला “जय महाराष्ट्र !”

आचरा येथील समीर हडकर यांचा “ना”राजीनामा ; माजी आ. वैभव नाईकांवर आरोप

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा येथील ठाकरे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते समीर हडकर यानी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी वैभव नाईक यांच्यावर गटबाजी निर्माण करत असल्याचा आरोप केला असून आपण निर्माण केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे मी शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा आपल्याकडे देत आहे, असे म्हटले आहे.

या राजीनामा पात्रात त्यांनी म्हटले आहे की, मी शिवसेना पक्षामध्ये गेली दहा वर्षे राजकारण आणि समाजकारण करत होतो आणि त्याद्वारे लोकांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. परंतु बदललेल्या राजकारणामुळे शिवसेना पक्षामध्ये सुद्धा गटातटाचे आणि सोयीचे राजकारण सुरू झाले. त्याचीच परिणीती स्थानिक पातळीवर झाली. त्याकडे आपण हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले. आपण निर्माण केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे मी शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. भविष्यात आपल्या पक्षाला उभारी मिळावी आणि आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र ! आपला, शिवसैनिक, समिर चंद्रकांत यानी असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!