आ. निलेश राणेंच्या माध्यमातून नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडून विकास कामांचा धडाका

नवीन कामांना मंजुरी, जुन्या रखडलेल्या कामांना चालना ; नागरिकांतून समाधान

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरु आहे. यात नवीन कामांना मंजुरी मिळवून देण्याबरोबरच जुन्या रखडलेल्या विकास कामांना चालना देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान जिल्हा स्तर २०२५-२६ मधून सातेरी मंदिर नजिकच्या अभ्यंकर पाणंदची उंची वाढवणे (४.९९ लाख) व आडवण दलित वस्ती मधील गटारावर लाद्या बसवणे (३.४९ लाख) या कामांचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या कामांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी नगरसेवकांचे सहकार्य मिळाले.यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, सौ. भाग्यश्री मयेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, संदेश चव्हाण, बाळा आचरेकर, दादू डिचोलकर, तेजस लुडबे, संजय वराडकर, तुळशीदास लुडबे, अक्षय माणगावकर, उत्तम चव्हाण, निकित वराडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!