राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देवगड तालुक्यातील मिठबांव शाखेला भेट ; संघांच्या शिस्त बद्ध संचलनात सहभाग
संघाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नाही, तर भविष्यातील भारताचा अढळ निर्धार : ना. राणे
देवगड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबांव येथील संघाच्या शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसमवेत विजयादशमी उत्सव साजरा केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या १०० वर्षांत अनुशासन, राष्ट्रभक्ती, सेवा आणि चारित्र्यनिर्मितीचा जो दीप प्रज्वलित केला आहे, तो आज संपूर्ण देशाला दिशा दाखवतो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला तसेच संचलनात सहभागी होऊन त्या उर्जेचा अनुभव घेतला. संघाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नाही, तर भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे.
संघाचे विचार, राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा आणि हिंदुत्वाचा अभिमान हीच खरी भारताची ताकद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.