खेडच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक; विधिवत पूजा अन् महाआरती संपन्न

गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

खेड : आमदार प्रमोद जठार यांनी आज खेडच्या राजाचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा व महाआरती केली. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसह महाराष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

यावेळी खेडच्या राजाच्या मंडपात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विधिवत पूजेनंतर आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. उपस्थित भाविकांनीही मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले.

याप्रसंगी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते वैभव खेडेकर, तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, शहर सरचिटणीस विजय गुप्ता यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने खेडचा परिसर दुमदुमून गेला.

error: Content is protected !!