महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघांच्या सहयोगाने आयोजन
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सर्व प्रकारच्या अन्न व खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने बुधवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी २.५५ ते ७.०० यावेळात मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण अन्न सुरक्षा परवानाधारकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठीही अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास यापुढे आपल्या अन्न सुरक्षा परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक परवाना धारकाने स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसह या मोफत प्रशिक्षणास हजर राहून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी केले आहे.