

आंदोलन मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (सोमवारी) मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी आंदोलन मार्गावरील लहान वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जारी केले आहेत.
याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंबा-काजु बागायतदार व व्यापारी महासंघ यांचे वतीने कणकवली पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव या ठिकाणी दि. 23.03.2026 रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन होणार आहे. त्या अर्थी मी डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग म्हणून मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीची कोंडी होवू नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होऊ नये याकरीता सदर मार्गावरील वाहतुक खालीलप्रमाणे तात्पुरती बंद व पर्यायी मार्गाने वळविणेत येत आहे. तरी सदर वाहतुक नियोजनास मोटार वाहन चालक, नागरिक यांनी सहकार्य करावे.
दि.23.03.2026 रोजी लहान वाहनाचे वाहतुकीसाठी वळविणेत आलेले मार्ग : पर्यायी मार्ग :- रत्नागिरी वरून सिंधुदुर्ग व गोवाकडे जाणारी वाहतुक (लहान प्रकारची वाहने) तळेरे येथे थांबवून खालील मार्गाने वळवतील. 1) तळेरे वैभववाडी लोरे फोंडा मार्ग हुमरठ (मुंबई गोवा महामार्ग) 2) फोंडा कनेडी कणकवली 3) कासार्डे फाटा उत्तर गव्हाण पियाळी लिगेश्वर फोंडा हुमरठ (मुंबई गोवा महामार्ग)

गोवा, सिंधुदुर्ग, कणकवली कडून रत्नागिरी/ मुंबई कडे जाणारी वाहतुक (लहान प्रकारची वाहने) खालील मार्गाने वळवतील 1) कणकवली हुमरठ तिठा फोंडा लोरे वैभववाडी तळेरे (मुंबई गोवा महामार्ग) 2) कणकवली वरुन कनेडी फोंडा लोरे वैभववाडी तळेरे (मुंबई गोवा महामार्ग) 3) कणकवली आचरा देवगड पडेल मार्गे रत्नागिरी.
सदरचा आदेश दि. 23.03.2026 रोजी सकाळी 09.00 ते रास्ता रोको संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच सदरचा आदेश पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.



Subscribe to my channel




