
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांची सेवा सुरू; मेंदू-मणक्यांच्या गंभीर आजारांवर पडवे येथेच तज्ज्ञ उपचार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी सुविधा आता पडवे येथेच उपलब्ध झाली आहे. राणेंच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा सुरू करण्यात आली असून, देश-विदेशात प्रदीर्घ अनुभव असलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांच्या तज्ज्ञ सेवा रुग्णांना मिळणार आहेत.
मेंदूतील गाठी, रक्तस्राव, मणक्याचे विकार, डिस्कच्या समस्या तसेच अपघातानंतरच्या डोक्याच्या आणि मणक्याच्या गंभीर दुखापतींवर तज्ज्ञ न्यूरोसर्जरी उपचार आता पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अशा उपचारांसाठी मुंबई, गोवा, पुणे किंवा बेळगाव येथे जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.
डॉ. फारुक अहमद यांचा देश-विदेशातील प्रदीर्घ अनुभव
डॉ. फारुक सईद अहमद यांनी मुंबईतील सर एच. एन. हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल येथे न्यूरोसर्जिकल प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सुमारे साडेअकरा वर्षे, तर सौदी अरेबियातील जुबैल जनरल हॉस्पिटलमध्ये १८ वर्षे ३ महिने न्यूरोसर्जरी कन्सल्टंट म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या अनुभवामुळे सिंधुदुर्ग आणि कोकणातील रुग्णांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ न्यूरोसर्जरी सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
अपघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीच्या उपचारांना मोठे बळ
डोक्याला किंवा मणक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर तातडीने योग्य उपचार मिळणे महत्त्वाचे असते. लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांच्या उपचार व्यवस्थेला यामुळे बळ मिळणार आहे. या ठिकाणी मेंदूतील गाठी व क्लिष्ट शस्त्रक्रिया, मेंदूतील रक्तस्रावावरील आपत्कालीन उपचार, मणक्याच्या डिस्क व स्पाईन विकारांवरील उपचार, मणक्यांच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया, Brain & Spine Trauma उपचार, आधुनिक एंडोस्कोपिक व मायक्रोस्कोपिक न्यूरोसर्जरी उपलब्ध असेल.
शासकीय योजनांचाही लाभ
रुग्णालयात कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, आयुष्मान भारत योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू असून पात्र रुग्णांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या आरोग्यसेवेत आणखी एक महत्त्वाची भर पडली असून अधिक माहितीसाठी ८२०८३२८११८ किंवा ९३७००५६०७६ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







Subscribe to my channel






