पर्यटन सप्ताहानिमित्त ३ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग महाविद्यालयात विद्यार्थिनी व महिलांसाठी वेशभुषा स्पर्धा

वीरांगना – भारतीय स्त्री योद्ध्यांची शौर्यगाथा” या विषयावर होणार स्पर्धा ; महिला विकास कक्ष, सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५-२६ निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. मालवण महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात “वीरांगना – भारतातील शूर स्त्री योद्ध्या” वेशभूषा स्पर्धा विद्यार्थिनी व महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक शूर स्त्रियांनी आपल्या शौर्य, त्याग आणि पराक्रमामुळे प्रेरणादायी ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत वय वर्षे १५ पुढील सर्व विद्यार्थिनी, महिला सहभागी होऊ शकतात. यातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ 3 पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांनी आपण निवडलेल्या वीरांगनेची वेशभूषा सादर करायची आहे, तसेच निवडलेल्या वीरांगनेबद्दल एखादा संवाद किंवा माहिती सादर करायची आहे. या साठी प्रत्येक स्पर्धकाला एका मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबर पूर्वी डॉ. उज्वला सामंत (मो. ९४२१२६१४३९) यांच्याकडे नावनोंदणी करावी. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी याच क्रमांकावर संपर्क साधावा. तरी सर्व विद्यार्थिनी, मालवण पंचक्रोशीतील महिलांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवून भारतीय शौर्यपरंपरेचा गौरव वाढविण्याचे आवाहन समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आय क्यू ए सी प्रमुख डॉ. सुमेधा नाईक व प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी केले आहे.

error: Content is protected !!