ना बुके, ना पोस्टर; विशाल परबांचा वाढदिवस जनसेवेसाठी..!

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडेतील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार; सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा

सावंतवाडी : वाढदिवस म्हटला की सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट! मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ‘बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ हा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देणारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर महिन्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा अभियान राबविण्यात आले होते. या अभियानातील सेवाभावी उपक्रमशीलता पुढे नेत विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोकसहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.

आरोग्यसेवेचा ध्यास; तळवडेतील शिबिराला प्रतिसाद

ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तळवडे येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाज ऐक्यवर्धक मंडळ, तळवडे यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घेतला.

वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा उत्सव!

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच माध्यमातून गरजू नागरिकांसाठी विधायक उपक्रम उभे करता येतात, हा विचार या मोहिमेतून मांडण्यात येत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवत आरोग्यसेवा आणि जलसंधारणासाठी योगदान देण्याचा संदेश विशाल परब यांच्या या उपक्रमातून दिला जात आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ ही संकल्पना केवळ वाढदिवसापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीची लोकचळवळ बनावी, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवा नेते विशाल परब, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग, बाळा तळकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण ऊर्फ बाळा जाधव, आप्पा परब, सुहास पिकुळकर, अण्णा मालवणकर, लवू परब, शाम कुंभार, विकास गावडे, नम्रता गावडे, मंगलदास पेडणेकर, स्मिता परब, प्रवीण लोके, सुशांत गावडे, ग्रामविकास अधिकारी सद्गुरू गावडे, शंकर सावंत, बाळा भगत, शाम शेटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!