चिंदर येथील श्री वाडात्री ब्राह्मणदेव मंदिराच्या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
मालवण : मालवण तालुक्यातील पळसंब, चिंदर, कुडोपी, मठबुद्रुक आणि निरोम येथील विविध मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहांना कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतले तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या भक्तीमय परंपरेचे कौतुक केले.
दरम्यान, वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर येथील श्री वाडात्री ब्राह्मणदेव मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या सभामंडपामुळे मंदिरातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना सोयीची सुविधा उपलब्ध झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचे आभार मानले.
या दौऱ्यावेळी आडवली-मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, प्रवीण सावंत, चिंदर येथे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, चिंदरचे माजी सरपंच प्रकाश वराडकर, पळसंबचे उपसरपंच अविराज परब, पळसंब शाखाप्रमुख रामदास चव्हाण, उपशाखाप्रमुख अमित पुजारे, संजू सामंत, संजय हडपी, प्रसाद टोपले, मिलिंद चिंदरकर, ममता पांचाळ, महेश पांचाळ, विजय सावंत, कानबा अपराज, पिंट्या साळकर, रोशन अपराज, चंदू अपराज, मंगेश सावंत, मुकेश सावंत, राजू खरात आदी उपस्थित होते.
पळसंब येथे प्रमोद सावंत, पिंट्या सावंत, एकनाथ चिंचवलकर, आप्पा सावंत, मुकेश सावंत, दर्शन चिंदरकर, संतोष पाटणकर, निलेश रेवडेकर आदी उपस्थित होते.निरोम येथे विश्वास आचरेकर, मनोज राऊत, सुभाष राऊत, संजय राऊत, सुदाम राऊत, संदेश राऊत, भरत राऊत, चंद्रकांत घाडी, संतोष घाडी, बाळा राऊत, मंगेश राऊत आदी उपस्थित होते.
कुडोपी येथे राजू हिर्लेकर, सुभाष वाळवे, राजाराम वाळवे, संतोष पाटणकर, अशोक वाळवे, रत्नाकर वाळवे, समीर हिर्लेकर, भास्कर पडवळ, मनोहर मुणगेकर, प्रवीण मुणगेकर आदी उपस्थित होते.
मठबुद्रुक येथे जनार्दन सावंत, जगदीश केळुसकर, संतोष गोलतकर, सागर कदम, उमेश पेडणेकर, राकेश गावडे, उत्तम मल्हार आदी उपस्थित होते.





Subscribe to my channel




