पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभागांचा आढावा बैठक, (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग) सकाळी ११.४५ वाजता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ मंडळच्यावतीने “सेवा पंधरवडा” यानिमित्ताने Vocal for Local च्या माध्यमातून स्वदेशी वस्तु, लघु उद्योजक व स्वयं उद्योग सहाय्यता गट यांच्या उत्पादन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : मराठा समाज हॉल, कुडाळ). दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे बैठक(स्थळ : शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी)

error: Content is protected !!