जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या आशीर्वादाने प्रमोद जठारांच्या सेवा संकल्पाला आध्यात्मिक बळ!

नाणीज मठात सदिच्छा भेट; आमदार प्रमोद जठारांच्या हस्ते गणरायाची आरती

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा व समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात करत असताना आमदार प्रमोद जठार यांनी पाली-नाणीज येथील मठाधिपती जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची नाणीज मठ येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार जठार यांनी स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीदरम्यान नाणीज मठात विराजमान श्री गणरायाच्या आरतीचा मान आमदार प्रमोद जठार यांना मिळाला. भक्तिभावाने गणरायाची आरती करत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मठातील आध्यात्मिक वातावरणामुळे या प्रसंगी भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या सेवा, समाजहित आणि जनकल्याणाच्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांची ही सदिच्छा भेट विशेष ठरली. आध्यात्मिक आशीर्वाद घेत सेवा कार्याला प्रारंभ करण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला. यावेळी स्वामी काफीनाथ महाराज, भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि संजय यादव उपस्थित होते.

error: Content is protected !!