शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर

चौकीदाराच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशा आशयाचा बॅनर

ठाकरे शिवसेनेने श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावर जनतेचे वेधले लक्ष

कणकवली : ज्यांनी आपल्या प्रोफाइलवर “मी ही चौकीदार” असे लिहिले होते, त्यांच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशी टीका शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजप पक्षावर केली आहे. त्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवली येथील नरडवे चौक येथे लावला असून श्रीराम मंदिरातील देणगीच्या चोरी प्रकरणावर जनतेचे लक्ष वेधले आहे. हा बॅनर कणकवलीत चर्चेचा विषय बनला आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेली देणगीची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. या चोरी प्रकरणी भाजप पक्षावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या चोरी प्रकरणाबाबत भाजप पक्षावर टीका केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाने “मी ही चौकीदार” हि राजकीय मोहीम राबविली होती. त्याच मोहिमेचा दाखला देऊन शंकराचार्य यांनी चौकीदाराच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? असा सवाल उपस्थित करून भाजप पक्षाला लक्ष केले आहे.

error: Content is protected !!