मालवणवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या चरणी प्रार्थना; व्यापारी बांधवांशी साधला संवाद
मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या ऐतिहासिक वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी भक्तिभावाने सहभाग घेत ग्रामदैवतांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समस्त मालवणवासीयांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांतता आणि सर्वांगीण कल्याणासाठी ग्रामदैवतांच्या चरणी प्रार्थना केली.
मालवणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या पालखी सोहळ्याला भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. ग्रामदैवतांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या या सोहळ्यातून मालवणवासीयांची ग्रामदैवतांप्रती असलेली श्रद्धा आणि परंपरेशी असलेले अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
या सोहळ्याच्या निमित्ताने आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील अनेक व्यापारी बांधवांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नागरिक आणि तरुणांमध्येही त्यांच्याबरोबर छायाचित्रे व सेल्फी घेण्यासाठी उत्साह दिसून आला. आमदार राणे यांच्याशी संवाद साधताना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख राजू बिडये, क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, नगरसेविका शर्वरी पाटकर, महिला व बाल कल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, पंकज सादये, अश्विनी कांदळगावकर, मेघा सावंत, ललित चव्हाण, कुडाळ नगरसेवक अभि गावडे, विश्वास गांवकर, संग्राम साळसकर, अखिलेश शिंदे, अभय कदम, भाई मांजरेकर, मनोज हडकर यांच्यासह शिवसैनिक, नागरिक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.





Subscribe to my channel




