वेंगुर्ल्यात ८,९ नोव्हेंबरला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी चाचणी परीक्षा

वेंगुर्ला : माजी विद्यार्थी संघ – न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, अभिनव फाउंडेशन, सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी ३० मुला मुलींची निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गात निवड होण्यासाठी लेखी चाचणी परीक्षा दिनांक ८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथे आणि मैदानी निवड चाचणी दिनांक ९ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे होणार आहे.

सदरच्या निवड चाचणी करिता ५ नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करणे बंधकारक आहे. नोंदणीकरिता आणि अधिक माहिती करिता समीर घोंगे यांना ९९६००३६१७४ या क्रमांकावर संपर्क करावा. ऑफलाईन नोंदणीचे फॉर्म खालील ठिकाणी ५ नोव्हेंबर पर्यंत वेंगुर्ला – किरात कार्यालय, वेंगुर्ला, सावंतवाडी – अभिनव ग्रंथालय, आत्मेश्वर मंदिराजवळ, सावंतवाडी येथे उपलब्ध असतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!