
समीर वायंगणकर द्वितीय, भूषण मेतर तृतीय; मालवण नगरपरिषदेत विजेत्यांचा गौरव
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत आयोजित ‘पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी सजावट स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी नगरपरिषदेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत गौरेश शरद कांबळी यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. समीर सुभाष वायंगणकर यांनी द्वितीय, तर भूषण राजन मेतर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेत यश श्रीकृष्ण तारी आणि पार्थ प्रसाद वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि कापडी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उद्योजक तथा शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, नगरसेवक मंदार केणी, स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी, स्पर्धक आणि पत्रकार उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सजावट, प्लास्टिकचा कमी वापर, पुनर्वापर आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेश सजावट करण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले. स्पर्धेच्या मूल्यमापनात योगदान दिल्याबद्दल परीक्षक स्वाती भालचंद्र पारकर आणि पार्थ साईनाथ मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीकृष्ण धाकु खोत, प्रफुल्ल वसंत देसाई, विजय चंद्रकांत अटक, अनिता अनिल केळुसकर, मधुकर दिगंबर चव्हाण आणि श्रीप्रसाद दयानंद सकपाळ यांना प्रमाणपत्र व कापडी पिशवी देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा शपथ’ घेत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि हरित मालवणचा संकल्प केला. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.







Subscribe to my channel






