१ जानेवारी २०१० नंतर जन्म झालेल्या इच्छुक खेळाडूंनी १२ जूनपर्यंत नावे नोंदवण्याचे आवाहन


मालवण : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या “सीएम चषक” ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी होणार आहे.
या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ज्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर झालेला आहे, तेच खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी आपले नाव शुक्रवार दि. १२ जून २०२६ पर्यंत नोंदवणे अनिवार्य आहे. संपर्क व नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे (मो. ९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा.
नावनोंदणी केलेल्या सर्व पात्र खेळाडूंची मैदानावर शारीरिक आणि कौशल्य चाचणी (Fitness & Skill Test) घेतली जाईल. या चाचणीतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारेच अंतिम सिंधुदुर्ग जिल्हा संघ (मुले व मुली) निवडला जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंना राज्य पातळीवर आपली चमक दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे. मुख्य राज्यस्तरीय स्पर्धा २३ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.







Subscribe to my channel






