महाशिवरात्री उत्सवानिमित्त तारकर्लीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण : श्री सदगुरु साई मंदिर, रांजेेश्वर–तारकर्ली येथे १५ फेब्रुवारी व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सदगुरु सखाराम महाराज मठ येथे ग्रंथदर्शन होणार असून सायंकाळी ६.०० वाजता ‘शिवलीलामृत’ ग्रंथ पठण आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.०० वाजता श्री साईबाबांची आरती होणार असून रात्री ८.०० वाजता भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महापुरुष महिला भजन मंडळ, वरचीवाडी–तारकर्ली तसेच नाट्य झुंजार मंडळ, तारकर्ली यांचे भजन होणार आहे. रात्री १०.०० वाजता बक्षीस वितरण समारंभ (वर्धापन दिन २०२६) पार पडणार आहे. या महोत्सवात समस्त बांधव-भगिनी तसेच श्री साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सदगुरु साई मंडळ, रांजेेश्वर तारकर्ली (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!