मालवण लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न

सेवाकार्यातून लायन्स क्लब मालवणचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील : सहदेव बापर्डेकर

रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांना शपथ

मालवण : लायन्स क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व २०२६-२६ च्या नूतन संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी दैवज्ञ भवन मालवण येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्यासह सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांसह नूतन कार्यकारी मंडळाला लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्यावतीने शपथ देण्यात आली.

तसेच पदाधिकारी यांचा पदग्रहण संपन्न झाला. जास्तीत जास्त सेवा कार्य करून लायन्स क्लब मालवणचे नाव अधिकाधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अध्यक्ष सहदेब बापर्डेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन (LCIF) ला एक हजार रुपये डॉलर देणगी देत असल्याचे त्यांनी जाहीर जाहीर केले.

यावेळी लायन्स क्लब पदाधिकारी सदस्य यांनी उभे राहत सहदेव बापर्डेकर यांच्या सेवाकार्या बद्दल आभार व्यक्त केले.यावेळी लायन्स क्लब जेष्ठ पदाधिकारी मान्यवर विजय जमदग्नी, केशव फाटक, अजित भणगे, नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक, जिल्हापरिषद सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र पराडकर, यांसह लायन्स क्लब पदाधिकारी, सदस्य, रोटरी क्लब पदाधिकारी व मित्रपरिवार उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

नूतन संचालक मंडळ 2026-27

अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, माजी अध्यक्ष झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, प्रथम उपाध्यक्ष मनाली दळवी, द्वितीय उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, तृतीय उपाध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, सहसचिव अंजली आचरेकर, सह खजिनदार मुकेश बावकर, टेल टिस्टर मिना घुर्ये, टेमर जयश्री हडकर, स्वच्छ भारत मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन मेघ:श्याम शंकरदास, एलसीआयएफ चेअरमन स्नेहा जामसंडेकर, पीआरओ दिक्षा गांवकर, जीएसटी चेअरमन, फॅनी फर्नांडिस, जीएलटी चेअरमन पल्लवी खानोलकर, जीएमटी चेअरमन डॉ. हरीश परुळेकर, मिशन 1.5 श्वेता यादव, ॲक्टिव्हीटी चेअरमन नंदिनी गांवकर, हेल्थ अवरनेस वैशाली शंकरदास, लीडरशिप शाम नार्वेकर, साईट फस्ट डॉ. प्रिया रिवणकर, बुथ प्रोग्राम रूपा कांदळगांवकर, फंड रेजिंग ऋग्वेदा धामापूरकर, डायबेटीस अवरनेस डॉ. दर्शन खानोलकर, बुलेटिन ऐडिटर मनिषा गांवकर, रेलिविंग हंगर विश्वास गांवकर, पर्मनंट प्रोजेक्ट महेश कारेकर तसेच संचालक मंडळ : नाना साईल, महेश अंधारी (पीएमजेएफ), रुजारिओ पिंटो (एमजीएफ), उमेश नेरुरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, गणेश प्रभुलकर, दत्ताराम रेवणकर, विराज आचरेकर, अरविंद सराफ, मोहन पटेल, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, शांती पटेल, उदय घाटवळ या नूतन संचालक मंडळचा शपथविधी संपन्न झाला. नवीन सदस्य म्हणून अन्वेशा आचरेकर, शेखर मोर्वेकर, सीए युगांत चव्हाण यांना शपथ देऊन त्यांचे लायन्स परिवारात स्वागत करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. 

लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांनी मार्गदर्शन पर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय घाटवळ, मिताली मोंडकर यांनी केले. 

error: Content is protected !!