
चिंदर येथील गावभेट कार्यक्रमात आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन
गावातील विकासकामांच्या पूर्ततेबाबत चिंदर ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार
मालवण : मालवण कुडाळ मतदार संघाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास होत असताना प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर विकास काम पोहोचवणे, जनतेला अपेक्षित विकास साध्य करणे हेच आमचे लक्ष आहे. चिंदर गावातही दहा कोटी पेक्षा जास्त निधीतून विकासकामे झाली असून विभागात 20 कोटी पेक्षा जास्त विकासकामे झाली आहेत. पुढील काळातही अनेक विकासकामे मार्गी लावली जातील. ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास पूर्ण करत असताना विकासनिधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी चिंदर येथे बोलताना दिली.
चिंदर येथील पारकर हॉल येथे गावभेट कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मानकरी मधुकर पाताडे, भाली अण्णा पुजारे, विभागप्रमुख संतोष कोदे, उपतालुकाप्रमुख मंगेश गावकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, पं स सदस्य गणेश तोंडवळकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, शशिकांत नाटेकर, भाऊ हडकर, दत्ता वराडकर, मनोज हडकर, श्री साटम यासह पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने संख्येने उपस्थित होते. यावेळी चिंदर ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा यावेळी भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

चिंदर गावच्या विकासात आमदार निलेश राणे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त होत आहे. विकासकामांचे सर्व श्रेय आमदार निलेश राणे यांच्यासह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व महायुती सरकारचेच आहे. असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आचरा गावात तलाव, रस्ते याठी 10 कोटी पेक्षा जास्त निधी आला. आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यात महत्वाचा राहिला. चिंदर तलावासाठी निधी खासदार नारायण राणे यांच्या एका फोन कॉलवर तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला. विभागात सुमारे 20 कोटी कामे झाली. आणखीही होणार यां सोबत गेल्या महिनाभरात ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज असलेली सुमारे 18 कामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने केली. यात चिंदर तेरई रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर लब्देवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर कावले घर लब्देवाडी रस्ता तयार करणे, चिंदर साठमवाडी रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर सडेवाडी गोसावीवाडी गणेश घर कडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर सडेवाडी देवकोंड वाडी गणेश घर रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर सडेवाडी स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर सडेवाडी स्मशानशेड बांधणे, चिंदर मुख्य रस्ता ते सडेवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर भटवाडी येथील मुळे घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे, चिंदर गावडे पुर रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर बाणवाडी रस्ता मजबुतीकरण करणे, चिंदर कुंभारवाडी – कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर कुंभारवाडी येथे येथे गणेश घाट सुशोभीकरण करणे, चिंदर सडेवाडी गोसावीवाडी थागरे घर रस्ता तयार करणे, चिंदर मसुरकर वाडी महापुरूष पार बांधणे, चिंदर पालकर वाडी पावणवाडी येथे एस टी वाहतुकीस अडथळा होणारा विद्युत पोल तात्काळ हलवून देण्यात आला, चिंदर पडेकाय रस्ता मजबुतीकरण करणे. ही कामे आहेत. यापुढे आणीही कामे होत राहतील असे शशी नाटेकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, भाजपा विधानसभा प्रभारी असल्यापासून सातत्याने गावागावात विकासकामांसाठी पाठपुरावा सुरु असताना अनेक विकासकामे मार्गी लागली. जे काम आम्ही केले ते जनतेला माहिती आहे. याठिकाणी पूर्वी विरोधी आमदार असतानाही त्यांच्या विकासकामांचे नारळ आम्ही कधी फोडले नाही. आणि तशी गरजही भासली नाही. कारण महायुती सरकारकडे ज्या ज्या कामांची मागणी आम्ही केली ती सर्व कामे खासदार राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात महायुती सरकार कडून होत राहिली. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आता पालकमंत्री नितेश राणे यांचे या सर्व विकास प्रक्रियेत महत्वाचे योगदान आहे. आमदार निलेश राणे यांचे मागणीपत्र असल्याशिवाय त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुठलेच काम मंजूर केले नाही. आताही महायुती सरकारच्या माध्यमातून खासदार राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान विकास प्रक्रियेत आहे. मागील काळात मंजूर झाली. पंतप्रधान/ मुख्यमंत्री ग्रामसडक, अन्य रस्ते, तलाव तसेच ब्रिज व अन्य विकासकामे भाजपा प्रभारी असताना पासून आता आमदार काळात झाली. सुमारे 20 कोटीची कामे विभागात झाली आणीही प्रस्तावित आहेत. ही सर्व जनतेची सेवा आहे. जनतेचे आशीर्वाद आहेत असे आमदार निलेश राणे म्हणाले.

आमदार निलेश राणे पुढे म्हणाले, सभागृहात जनतेच्या मागण्या, समस्या मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. मतदार संघात जास्तीत जास्त निधी आणणे हेच आपले लक्ष आहे. गेल्या दहा वर्षात काहीच झाले नाही. विकासाचा बँकलॉग भरून काढत असताना अधिकाधिक विकासनिधी हेच लक्ष आहे. गावागावात सर्वांगीण विकास होत असताना राजकारण नको. तसेच गावाचा सर्वांगीण विकास हेच लक्ष असावे असेही आमदार निलेश राणे म्हणले.
दत्ता सामंत यांचे कौतुक
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कामाचेही आमदार निलेश राणे यांनी विशेष कौतुक केले. माझे व त्यांचे जिवाभावाचे नाते आहे. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. संघटनेसाठी ते देत असलेले योगदान मोठे आहे. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
आ. निलेश राणे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व
दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. प्रत्येक गावात विकासनिधी पोहोचवत असताना विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. जनतेला अपेक्षित विकास साध्य झाला पाहिजे यासाठी त्यांची तळमळ असते. प्रत्येक अधिवेशनात जनतेच्या न्याय हक्कासाठी भांडणारे आमदार निलेश राणे खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ विकासकामात अग्रेसर राहील असे दत्ता सामंत यांनी सांगितले. तसेच चिंदर गावात झालेल्या विकास कामांचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच आहे. देवी माऊलीच्या आशिर्वादामुळे हे सर्व होत आहे. यापुढे होत राहील असेही दत्ता सामंत म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर हेच लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे कुटुंबाला सर्वकाही दिले आहे. कुटुंबातील तीन राणे देशाच्या आणि राज्याच्या सभागृहात आहेत. हा चमत्कार सिंधुदुर्गने केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गसाठी जे जे शक्य आहे, ते सर्वकाही करत राहणार. जिल्हा अग्रेसर हेच आपले लक्ष आहे. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.







Subscribe to my channel






