ताई, कोणतीही मदत लागली तर हक्काने सांगा… आम्ही सदैव आपल्या कुटुंबासोबत आहोत…!

माजी खासदार निलेश राणेंकडून मलये कुटुंबियांचे सांत्वन

मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तथा कोळंब गावचे माजी सरपंच सुनिल नारायण मलये यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी मलये कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “ताई, कोणतीही मदत लागली तर हक्काने सांगा. आम्ही सदैव आपल्या कुटुंबासोबत आहोत.” असा शब्द निलेश राणे यांनी मलये कुटुंबाला दिला.

रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या सुनील मलये यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मलये यांनी कोळंब गावचे सरपंच पद भूषविले होते. खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांच्या अन्याया विरोधात न्यायालयीन लढा देत कामगारांना न्याय मिळवून दिला होता. सामाजिक क्षेत्रातील ग्रामीण भागातील नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आला.
शुक्रवारी माजी खासदार निलेश राणे यांनी मलये यांच्या कातवड येथील निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. भाऊ या नात्याने हक्काने सोबत असल्याचा धीर निलेश राणे यांनी सुनील मलये यांच्या पत्नीला दिला. तसेच काही मदत लागल्यास हक्काने सांगा असे निलेश राणे यांनी सुनील मलये यांच्या भाऊ यांना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3606

Leave a Reply

error: Content is protected !!