मालवणात उद्या ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ ऐतिहासिक कार्यक्रम.

मालवण : येथील श्री शिवराज मंच यांच्यावतीने शनिवारी २७ सप्टेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग व बंदर जेटी येथे ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा पाया असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री जरीमरी देवी व श्री भवानी देवी यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. 

कार्यक्रमासाठी कवी भूषण, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक, मोडी लिपी तज्ञ पंकज भोसले आणि शिवशंभु विचारमंच व ममता भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरील देवींची ओटी भरण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात स्वराज ढोल पथक यांच्यातर्फे शिववंदना सादर केली जाणार आहे. तसेच एएस १ प्लस पथक बिडवाडी यांच्या वतीने ऐतिहासिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. यात विशेषतः अठरा मुली मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. यात सायंकाळी ४ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे देवी ओटी भरणे कार्यक्रम होईल. त्यानंतर ४.३० वाजता बंदर जेटी येथे ढोल पथक आणि मर्दानी खेळ कार्यक्रम होणार आहे. सर्व शिवप्रेमी मालवणवासीयांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!