आचरा येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अवधूत हळदणकर

व्हाईस चेअरमन पदी संतोष मिराशी यांची निवड ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

आचरा : येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी अवधूत हळदणकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी संतोष मिराशी यांची निवड करण्यात आली आहे.

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या आचरा येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनलने निर्विवाद विजय मिळवित सर्वच्या सर्व १३ ही जागांवर विजय मिळवला होता. या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड शनिवारी करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस, बाबु परुळेकर, समीर बावकर, धनंजय टेमकर, लवू मालंडकर, विश्वास गावकर, डॉ. प्रमोद कोळंबकार, पपू घाडी, प्रशांत पांगे, निशा गावकर, मनाली तोंडवळकर, प्रिया आचरेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!