विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, पुनर्वसन प्रक्रिया व आधुनिक उपकरणांचा वापर याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोलीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन येथे पार पडली. या भेटीत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, पुनर्वसन प्रक्रिया व आधुनिक उपकरणांचा वापर याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक यांचेही प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील आव्हाने आणि फिजिओथेरपीची उपयुक्तता याची वास्तवदर्शी ओळख झाली. या उपक्रमामागे संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे सर, संचालिका सौ. स्मिताली राजपुरे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच फिजिओथेरपी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार लिंगायत सर यांचे विशेष मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळाले. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक ज्ञान मिळाले असून त्यांच्या भावी करिअरसाठी ती प्रेरणादायी ठरली.