भाजपा पुरस्कृत पॅनलच्या विजयी उमेदवारांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद
मालवण | कुणाल मांजरेकर
प्रतिष्ठेच्या मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार पॅनेलने घवघवीत यश मिळवले. या विजयानंतर या पॅनलच्या विजयी उमेदवारांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी वाटचलीसाठी ग्रामदैवतेला साकडे घालण्यात आले.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलने अभूतपूर्व यश मिळवले आहे. खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ ही जागा भाजपच्या ताब्यात आल्यानंतर सोमवारी भाजपचे विजयी उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, भाऊ सामंत, महेश सारंग, ललित चव्हाण, राकेश सावंत यांच्यासह उमेदवार उमेदवार आबा हडकर, अशोक तोडणकर, के. पी. चव्हाण, विजय ढोलम, कृष्णा ढोलम, अमित गावडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी विजयी उमेदवारांनी भरड वायरी येथील चेतन मुणगेकर यांच्या स्वामी समर्थ मठात स्वामींचे आशीर्वाद घेतले.