कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक मध्यरात्री पासून लागू होणार….

बदलेल्या वेळा लक्षात घेऊन प्रवाशांनी स्थानाकावर पोहोचावे : कोकण रेल्वेने केले आवाहन

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या मार्गावर रविवारी १५ जूनच्या मध्यरात्रीपासून मान्सून वेळापत्रक लागू होत आहे. यामुळे सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या रेल्वे फेऱ्या त्यांच्या नियमित वेळे पेक्षा काही वेळ आधी मान्सून टाइमटेबल प्रमाणे धावतील. यामुळे प्रवाशांनी या बदलेल्या वेळा लक्षात घेऊन स्थानकावर पोहोचावे असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

कोकण रेल्वेने १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी विशेष मान्सून वेळापत्रक लागू केले आहे. या पावसाळी कालावधीत रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्यात आला असून, काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. मुसळधार पावसात आणि कमी दृश्यमानता (Visibility) असलेल्या भागात लोको पायलटला गाड्यांचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३७ पेक्षा जास्त गाड्यांच्या जोडप्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अनेक गाड्या मूळ स्थानकावरून १५ ते ३० मिनिटे आधी सोडण्यात येत आहेत.

error: Content is protected !!