राजापूर येथे रंगली भव्य सामूहिक चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न

रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई, ओशिवळे यांच्यावतीने आयोजन ; आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ

राजापूर : राजापूर तालुक्यातील ओशिवळे गावामध्ये गुरववाडी माळ येथे रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई यांच्यावतीने भव्य सामूहिक चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये गावठी व खिल्लार बैल अश्या दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये 100 हुन अधिक बैल जोड्यांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम दोन विजेत्या बैल जोड्यांना मानाची ढाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई यांच्यावतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते विजेत्या बैल जोड मालकांना मानाची ढाल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. आमदार प्रमोद जठार यांनी विजेत्या बैल जोड्यांन समवेत फोटो काढत चिखल नांगरणी स्पर्धेचा आनंद लुटला. यावेळी रॉयल ग्रुप चे सहकारी बैल जोड्या मालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!