मालवण बाजारपेठेतील “त्या” विकास कामासाठी तब्बल १७.६८ लाखांचा निधी

अमेय देसाई, आकांक्षा शिरपुटे यांचा यशस्वी पाठपुरावा ; नागरिकांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण बाजारपेठ येथील भरड ते कासार व्हाळी दलितवस्ती येथील गटाराच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे १७ लाख ६८ हजार २३९ रुपयांचा निधी आ. वैभव नाईक यांनी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन आ. नाईक यांच्या उपस्थितीत सुधाकर माणगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख राजू परब, किरण वाळके, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, आकांशा शिरपुटे, सेजल परब, शीला गिरकर, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर यांच्यासह स्थानिक नागरीक सुधाकर माणगावकर, बंटी माणगावकर, हेमंत माणगावकर, केदार देसाई, तुषार मेस्त्री, गुरुनाथ नाईक, अंकित कोवळे, तुषार मेस्त्री आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!