यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे ८ ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’

जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सवाचे आयोजन ; देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्य, समूह नाट्य छटा, लघु नाट्य स्पर्धाचे आयोजन

सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृतमूल्यांचा, देशभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव – २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सव शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन देशभक्तीपर समूह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभक्तीपर समूहगीत, देशभक्तीपर समूहनृत्य आणि देशभक्तीपर समूह नाट्यछटा/लघुनाट्य या स्पर्धांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी संघरचना ६ ते १५ विद्यार्थ्यांची असून प्रत्येक सादरीकरणासाठी कालावधी ५ मिनिटे असेल. प्रत्येक शाळेला एक, दोन किंवा तिन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. मात्र प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र संघ असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. ३०० (तीनही प्रकार मिळून) निश्चित करण्यात आली असून नोंदणीची अंतिम तारीख ५ ऑगस्ट आहे.

प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांनाही ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यमाच्या सर्व मान्यताप्राप्त शाळा सहभागी होऊ शकतात. या देशभक्तीपर कला महोत्सवात जास्तीत जास्त शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी ९१६७०७७९४० या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!